ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शुक्रवारी रात्री बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण आहे. फोटोमध्ये ते अगदीच अशक्त झाल्याचे दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आता त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती विनोद खन्ना यांचा मुलगा राहुलनं दिली आहे.
राहुलनं हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचा-यांचा मी खूप आभारी आहे. हॉस्पिटलमध्ये बाबांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात आली. प्रकृतीत चांगल्या गतीनं सुधारणा होत असल्यानं त्यांना लवकरच डिस्चार्ज देणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.
विनोद खन्ना यांनी "मेरे अपने", "कुर्बानी", "पूरब और पश्चिम", "रेशमा और शेरा", "हाथ की सफाई", "हेरा फेरी", "मुकद्दर का सिकंदर" यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये "मन का मीत" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत "दिलवाले" या सिनेमात ते शेवटचे दिसले होते.
विनोद खन्नांसाठी "गेट वेल सून"चे संदेश
Wishing speedy recovery Vinod Khanna Saahab @VinodKhanna get well soon.. God bless you