८० च्या दशकातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आता इंडस्ट्रीतून गायब आहेत. या अभिनेत्रींपैकी एक नायिकेचे नाव आहे मंदाकिनी. 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या चित्रपटातून मंदाकिनी (Mandakini) प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती. मात्र तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जोडले गेल्याने अभिनेत्रीचे आयुष्य इतके उद्ध्वस्त झाले होते की, तिला आता सिनेविश्वापासून दूर जावे लागले. काळानुसार मंदाकिनीचा लूक खूप बदलला आहे. आता तिला ओळखणं कठीण झालं आहे.
मंदाकिनीने १९८५ साली 'मेरा साथी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्री खरं नाव आहे यास्मिन जोसेफ. तिला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते. 'राम तेरी गंगा मैली' नंतर मंदाकिनी अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला या चित्रपटातून इतकी प्रसिद्धी मिळाली नाही. मंदाकिनीच्या चित्रपटांमध्ये 'आग और शोला', 'अपने अपने', 'प्यार करके देखो', 'हवालत', 'नया कानून' आणि 'दुश्मन' यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटातील अभिनयापेक्षा मंदाकिनीचे सौंदर्य लोकांना जास्त आवडले.
मंदाकिनीला १९९४-९५ साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत पाहिले होते. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही.