- Shama Bhagat -
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने देशासह परदेशात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा आगामी हॉलिवूडपट ‘बेवॉच’च्या निमित्ताने तिच्याशी साधलेला हा संवाद...मायदेशात परतल्यावर पहिल्यांदा तू काय केलेस?- मी माझ्या फॅन्सना भेटले. त्यानंतर मी माझ्या जुहूमधील घरी गेले. तिकडे जाऊन तिथली शुद्ध हवा एन्जॉय केली. मी माझी काही पुस्तके नीट लावून ठेवली, घरातला सोफा बदलला. मला माझे नवे घर सजवायला या आधी अजिबात वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे इथे आल्यावर मी आधी ते केले. तू तुझ्या आईला तिकडे मिस केलेस का? - आई इकडे आणि अमेरिकेत येऊन-जाऊन असायची. तिला तिकडे यायचे फक्त एखादे कारण लागायचे. सो, ती नेहमीच माझ्याबरोबर तिथे होती.‘क्वांटिको" चा नवा सीजन येणार आहे का?- मला माहिती नाही. त्यांनी सुद्धा अजून काहीच ठरवले नाही. त्यामागचे कारण असे की प्रत्येक सिजननंतर ‘क्वांटिको’ ची टीम सध्या लोकप्रिय असलेल्या शोचा आणि टी.आर.पी.चा अभ्यास करतात आणि मग ठरवतात, की पुढील सिजन करायचा की नाही ते.आता तू परत आली आहेस. मग एखादा चित्रपट साईन केला आहेस का? तुझा पुढचा प्लॅन काय आहे?- मी अजून काहीच प्लॅन केलेला नाही आणि ना आधी गोष्टी घडत गेल्या. मी काही प्लॅन नव्हते केले. मी एक कलाकार आहे आणि त्याच नात्याने मी परदेशात गेले होते. ‘क्वांटिको’च्या प्रेमात पडले होते मी. मला फक्त १३ एपिसोड करायचे होते, पण त्यानंतर त्याचे २६ एपिसोड झाले आणि नंतर ३९ एपिसोड मी केले.बेवॉचच्या टीमसोबत प्रमोशनसाठी तू भारतात येणार आहेस का?- खरे सांगायचे तर आता प्रमोशनसाठी आमच्याकडे फारसा वेळ राहिलेला नाही. बेवॉचची टीम प्रमोशनसाठी भारतात येणार नाहीये. आम्ही याचा प्रीमियर मियामी आणि बर्लिनमध्ये करणार आहोत. मी सध्या टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये बिझी आहे. आम्हाला जेवढे जास्त चित्रपटाचे प्रमोशन करता येईल तेवढे आम्ही करतोय.एक निर्माती म्हणून तू कुठल्या प्रकारचे चित्रपट प्लॅन करते आहेस?- आमच्याकडे आता ६ चित्रपट आहेत. ज्याच्यावर आम्ही काम करतो आहोत. आम्ही सिक्कीमच्या लोकांवर चित्रपट करतोय. सिक्कीममध्ये फिल्म इंडस्ट्री तेवढी विकसित नाहीये. आम्ही सरकारच्या मदतीने तिथे सेटअप करतोय. काही लोकांशी याबाबत बोलणी सुरू आहेत. जे तिथे राहून तिथल्या लोकांना चित्रपट तयार करण्याचे प्रशिक्षण देतील. एकदा का तो प्रयत्न यशस्वी झाला की, आम्ही तिथे भरपूर चित्रपट तयार करू शकतो. तिथे मोठ्या प्रमाणात स्थानिक कलाकार आहेत. आम्ही पंजाबी, बंगाली चित्रपटसुद्धा तयार करीत आहोत.तू बेवॉचमध्ये एका खलनायिकेची भूमिका साकारत आहेस. ती करताना बॉलिवूडमधल्या एखाद्या खलनायिकेकडून त्यासाठी प्रेरणा घेतलीस का? - मी बॉलिवूडमध्ये सुद्धा नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. ‘ऐतराज’, ‘सात खून माफ’ या चित्रपटांत माझ्या ग्रे शेड भूमिका होत्या. आपल्याकडे खलनायिका म्हणून फार कमी स्त्रीकलाकार आहेत. अशा प्रकारच्या भूमिका करणे आव्हानात्मक असते, असे काम करायला मजा येते. मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात.