बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री पूनम पांडे(Poonam Pandey)च्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये पूनमचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचे सांगण्यात आले होते. कॅन्सरमुळे एका दिवसात मृत्यू कसा होऊ शकतो असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. पूनम पांडेच्या मृत्यूबाबत कुटुंबीय किंवा बहिणीकडून अद्याप कोणतीही पुष्टी आलेली नाही. इंडिया टुडेने पूनम पांडेच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणतीही माहिती समोर आली नाही.
सूत्रांनी सांगितले की, त्यांना सकाळी पूनमच्या बहिणीचा फोन आला होता. पूनम आता या जगात नाही असे त्यांनी सांगितले होते. सर्वाइकल कॅन्सरमुळे पूनमचे निधन झाले आहे. यानंतर पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये तिच्या मृत्यूचा दावा करण्यात आला होता. तसेच चाहते आणि आप्तेष्टांना गोपनीयता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर, सूत्रांनी पूनम पांडेच्या बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन अनरिचेबल असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, आम्ही सकाळी पूनम पांडेच्या बहिणीशी बोललो. तिनेच आम्हाला तिच्या मृत्यूची माहिती दिली. तेव्हापासून आम्ही जेव्हाही तिच्या बहिणीला फोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिचा फोन बंद लागतो आहे. एवढेच नाही तर पूनमच्या कुटुंबातील इतर सदस्यही गायब आहेत. पूनमच्या टीममधील २-३ लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद आहेत. त्यामुळे तिचे चाहते आणि लोकांना तिच्या निधनावर विश्वास बसत नाही आहे.
काही दिवसांपूर्वी दिसली होती इव्हेंटमध्येकाही दिवसांपूर्वी पूनम पांडे इव्हेंट्स आणि पार्ट्या अटेंड करताना दिसली होती. तिने चार दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती बॉडीगार्डसोबत एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसली होती. याशिवाय तिने एका इव्हेंटमध्ये पापाराझींना असेही सांगितले की ती फर्स्ट क्लास आहे आणि चांगले आयुष्य जगत आहे. पूनमला कॅन्सर झाल्यामुळे तिने जगाचा निरोप घेतला आहे. पूनम शेवटची कंगना राणौतच्या 'लॉक अप' या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. अभिनेता करणवीर बोहरासोबत तिची चांगली मैत्री झाली होती.
अनेकदा अडकली होती वादाच्या भोवऱ्यातपूनम पांडे २०२० मध्ये प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने तिचा मित्र आणि लिव्ह-इन पार्टनर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले. पण लग्नाच्या १० दिवसांनंतर अभिनेत्रीने त्याच्याविरुद्ध शोषण आणि मारहाणीची पोलिस तक्रार दाखल केली. सॅमला गोव्यात अटक करण्यात आली. यानंतर सॅम बॉम्बेची जामिनावर सुटका करण्यात आली. पूनमने सॅमपासून अंतर ठेवले होते. अभिनेत्री म्हणाली होती की तिला अशा व्यक्तीसोबत राहायचे नाही जो तिचा आदर करत नाही. या वादावर पूनम आणि सॅम दोघेही खूप ट्रोल झाले होते. याशिवाय २०११ मध्ये पूनम पांडे म्हणाली होती की, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर ती न्यूड पोज देईल. यासाठी पूनमला खूप ट्रोलही व्हावे लागले. २०१६ मध्ये टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मोठा विजय मिळवला होता. टीमच्या विजयाचे सेलिब्रेशन करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर सेमी न्यूड फोटो पोस्ट केला होता.
दोन दिवसांपूर्वी केलेल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरलदोन दिवसांपूर्वी पूनम पार्टी करत होती. सोशल मीडियावर पूनम पांडेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अनेक अभिनेत्रींसोबत बसलेली दिसत आहे. ती ब्लॅक आउटफिटमध्ये पार्टी करताना दिसत आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री रोजलिन खानने लिहिले आहे की, जेव्हा एखाद्याला गर्भाशयाचा कर्करोग होतो तेव्हा बसताही येत नाही आणि ती पार्टी करत आहे. मला काहीतरी चुकीचं वाटतंय. हा व्हिडिओ केआरकेने (कमल आर खान) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कॅन्सरवर कानपूरमध्ये उपचार न घेतल्याचा खुलासाअभिनेत्री पूनम पांडे यांच्या कानपूरमध्ये झालेल्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. पूनम पांडे नावाच्या दोन रुग्णांवर कानपूरच्या रिजन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, दोघेही बरे आहेत. कानपूरमध्ये दोनच कॅन्सर रुग्णालये आहेत, अभिनेत्री पूनम पांडेवर दोन्ही ठिकाणी उपचार झालेले नाहीत. आता तिच्यावर कुठे उपचार झाले आणि कुठे नाही हे स्पष्ट झालेले नाही.