बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार पहायला मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार बिग बॉस मराठीच्या घरात जेल दिसणार असल्याचे समजते आहे.
हिंदी बिग बॉसच्या काही सीजनमध्ये जेल पहायला मिळाले. दर आठवड्याला या कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी स्पर्धक निवडले जातात. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस 12मध्ये तर जेलमध्ये जाण्यावरुन आणि जेलमध्ये गेल्यानंतर बरेच वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे या जेलमुळे शो कॉन्ट्रॉवर्शियल कन्टेंट मिळाला होता. हाच विचार करुन बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये या जेलचा प्रस्ताव ठेवला गेला असणार असे टाईम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
बिग बॉस मराठी सिझन दुसरा २६ मे संध्या. ७ वा. आणि रोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.