Join us

 पाकिस्तानी वंशाच्या या अभिनेत्याने मागितली मदत! म्हणे, मुस्लिम असणे प्रचंड भीतीदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 11:56 AM

अभिनेत्री झायरा वसीम हिने नुकतीच ‘अल्लाह’चे कारण पुढे करत, बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. आता पाकिस्तानी वंशाच्या एका हॉलिवूड अभिनेत्यानेही आपल्या मुस्लिम धर्माबद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देरिज नावाने प्रसिद्ध असलेला रिझवान अहमद ब्रिटनचा नागरिक असला तरीही तो मूळचा पाकिस्तानी आहे.

अभिनेत्री झायरा वसीम हिने नुकतीच ‘अल्लाह’चे कारण पुढे करत, बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. आता पाकिस्तानी वंशाच्या एका हॉलिवूड अभिनेत्यानेही आपल्या मुस्लिम धर्माबद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या जगात मुस्लिम असणे प्रचंड भयावह झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. रिजवान अहमद असे या अभिनेत्याचे नाव.एका मॅगझिनने त्याची ही प्रतिक्रिया ठळकपणे प्रकाशित केली आहे. गत २५ जूनला एका कॉन्फरन्सदरम्यान तो हे बोलला. गतवर्षी रिजवान अहमदला अमेरिकेच्या विमानतळावर कठोर चौकशीला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याला शिकागोमधील स्टार वॉर सेलिब्रेशनमध्ये त्याला सहभागी होता नव्हते. रिझवानने त्याच्यासोबत घडलेल्या या भीतीदायक घटनेचा उल्लेख केला आहे.

  याच घटनेवर बोलताना रिझवान म्हणाला होता की, ‘असे घडणे माझ्यासाठी नवे राहिलेले नाही.  प्रत्येक वेळी मला एअरपोर्टवर अशाप्रकारे अडवले जाते आणि माझी तपासणी केली जाते. मला अपमानास्पद वागणूक दिली जाते.’

 यावेळी रिझवानने काही सुप्रसिद्ध मुस्लिम सेलिब्रिटींच्या नावांचाही उल्लेख केला. ‘मुस्लिम व्यक्तिंनी जागतिक स्तरावर प्रसिद्धी आणि नाव मिळवले. पण यामुळे अमेरिकेतील इतर मुस्लिमांच्या स्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. अमेरिकन कॉमेडियन हसन मिनहज पीबॉडी अवार्ड जिंकतात. मला एमी अवार्ड मिळतो. इब्तिहाज मुहम्मद आॅलम्पिक जिंकतो. पण असे सगळे असूनही या मार्गात अनेक बाधा आहेत. आम्ही एकटे याचा सामना करू शकत नाही. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे. कारण सध्या मुस्लिम असणे खरोखरच भीतीदायक झाले आहे. प्रचंड भीतीदायक,’ असे त्याने म्हटले.

 रिझवानने Rogue One: A Star Wars Story, The Reluctant Fundamentalist’, Britz, Black Gold आणि Hamletअशा सुपर हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. रिज नावाने प्रसिद्ध असलेला रिझवान अहमद ब्रिटनचा नागरिक असला तरीही तो मूळचा पाकिस्तानी आहे.

टॅग्स :हॉलिवूडझायरा वसीम