बॉलीवूडचे नवोदित अभिनेता आणि डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवनचे म्हणणे आहे, की सलमान खानसोबत त्याची तुलना करणे चुकीचे आहे. सध्याची युवापिढी वरुण धवनला खूप लाइक करीत आहे. डेव्हिड धवनही म्हणाले, की ज्या पातळीवर आज सलमान खान आहे तिथे वरुण पोहोचणे मुश्कील आहे. जेव्हा वरुणचा ‘मैं तेरा हीरो’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याची तुलना गोविंदासोबत झाली. यात वरुणने गोविंदासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याची तुलना सलमानसोबत होत आहे. करण जौहरने त्याच्या ‘शुद्धी’ चित्रपटासाठी सलमानला साइन केले होते, पण आता वरुण काम करणार आहे. वरुण म्हणाला, की सलमान भाई से मेरी तुलना करना बेवकुफी आहे.
सलमानसोबत माझी तुलना करणे चुकीचे - वरुण
By admin | Published: July 06, 2015 2:53 AM