बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ची लाडकी लेक आयरा खान(Ira khan)सोबत मोठ्या थाटामाटात लग्न करत आहे. प्रथम रजिस्टर विवाह मुंबईत झाला. आता संपूर्ण कुटुंब आणि मित्र उदयपूरला पोहोचले आहेत. येथे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. ८ जानेवारीला मेहंदी सोहळा झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी पायजमा पार्टीत चांगलाच धुमाकूळ घातला. ९ जानेवारी म्हणजे आज एक संगीत सोहळा होणार आहे, ज्यामध्ये आमिर त्याची मुलगी आयरा आणि जावई नुपूर शिखरे यांच्यासाठी परफॉर्म करू शकतो. दरम्यान, आमिरचा पुतण्या इमरान खान(Imran Khan)चा आयराच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन(Lekha Washington)सोबत पोज देताना दिसतो आहे.
इमरान खान देखील आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टनसोबत सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहोचला आहे. त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. अरबाज खानप्रमाणे ४० वर्षांचा इमरान त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या प्रेयसीशी लग्न करणार का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
आयरा आणि नुपूर शिखरे यांचा रजिस्टर लग्न मुंबईत झाले तेव्हाही इमरान लेखासोबत उपस्थित होता. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमरानने 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या डॅशिंग लूकवर आणि चॉकलेट बॉय इमेजवर मुली फिदा होत्या. त्यानंतर तो 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'आय हेट लव्ह स्टोरी' आणि 'कट्टी बट्टी' आणि बऱ्याच चित्रपटात काम केले. मात्र त्याच्या करिअरचा आलेख वाढण्याऐवजी घसरत गेला. हळूहळू तो पडद्यापासून दूरही गेला. मात्र, आता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला असून त्याने लवकरात लवकर पुनरागमन करावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
इमरानला आहे एक मुलगीइमरान खानने १९ वर्षांचा असताना अवंतिका मलिकला डेट करायला सुरुवात केली. दोघांनीही २०१० मध्ये लग्न केले. मुलगीही झाली. पण कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. लग्नाच्या ८ वर्षानंतर दोघेही २०१९ मध्ये वेगळे राहू लागले. अवंतिका आपल्या मुलीसह इमरानच्या घरातून निघून गेली.