चिटीयाँ कलैया वे’ म्हणत जॅकलिनने सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करण्यासभाग पाडले होते हे तुम्हाला ठाऊकच असेल. आपल्या अभिनयाबरोबरच जॅकलिन फर्नांडिस तिच्या सौंदर्यामुळेही अनेकांची फेव्हरेट ठरतेय. वेगेवगळ्या शोमध्ये ती आपल्या स्टाइलिश लूकने चाहत्यांना घायाळ करतेय. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात जॅकलिनने रेड वनपीस परिधान करून रेड कार्पेट आपला जलवा दाखविला. या कार्यक्रमात जॅकलिनवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. क्लासिक रेड ड्रेस आणि हातात गोल्ड ब्रेसलेट एक एंटिक लूक देत होता. त्यामुळे जॅकलिनही आपल्या हटके स्टाइल स्टेटमेंटमुळे आयबॉल अट्रॅक्ट करण्यात यशस्वी ठरतेय. फक्त ड्रेसिंवरच नाही तर फिटनेसवरही खूप मेहनत घेत आपला योग्य तो डाएट फॉलो करत असल्यामुळे ती फिजिकलीही मेंटेन दिसत असल्यामुळे तीची पर्सनालिटीव्हाइजही ती स्वत:ला स्टाइलिश लूक देण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसतेय. जॅकलिन बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्टाईल स्टेटमेंट निर्माण करीत आहे हे वेगळे सांगायला नको.
जॅकलिनचा खुलून दिसणारा एंटिक लूक
By admin | Published: January 26, 2017 6:51 AM