Join us

जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:35 IST

गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. आज अखेर त्यांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत साताजन्माची गाठ बांधली आहे.

बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट कपल जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) विवाहबंधनात अडकले आहेत. गोव्यात पारंपरिक शीख आनंद कारंज सेरेमनी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात दोघांचे कुटुंब, नातेवाईक आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. आज अखेर त्यांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत साताजन्माची गाठ बांधली आहे.

साऊथ गोवा येथील ITC ग्रँड हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. पंजाबी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हे कपल लग्नबंधनात अडकलं. आज सकाळीच रकुलची चुडा सेरेमनी झाली. तर दुपारी ३.३० च्या शुभ मुहुर्तावर त्यांनी सातफेरे घेत नवीन आयुष्याची सुरुवात केली. काल संगीत नाईटचाही सर्वांनी आनंद घेतला. रितेश देशमुख, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, ईशा देओल, अर्जुन कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार या लग्नात हजर होते. तर आदित्य रॉय कपूर, शाहीद कपूर, अनन्या पांडे आज मुंबईहून गोव्याला रवाना झाले होते. जॅकी आणि रकुलच्या लग्नाच्या फोटोंची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंदाची बातमी देतील. सध्या त्यांच्या लग्नाच्या फंक्शन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऑक्टोबर 2021 मध्येच जॅकी आणि रकुलने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून दोघंही अनेक इव्हेंट्स, पार्टी, अवॉर्ड फंक्शन्समध्ये हातात हात घालून आलेले दिसले. तसंच त्यांच्या हॉलिडे ट्रीपही कायम चर्चेत होत्या. आज त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली असून रकुल भगनानी कुटुंबाची सून झाली आहे. 

जॅकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा 'बडे मिया छोटे मिया' हा आगामी सिनेमा रिलीज होणार आहे. तो सिनेमाचा निर्माता आहे. तर रकुलचा 'इंडियन 2' सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये तिने कमल हसन यांच्यासोबत काम केले आहे.

टॅग्स :जॅकी भगनानीरकुल प्रीत सिंगलग्नगोवाबॉलिवूडसेलिब्रेटी वेडिंग