Join us

जॅकी श्रॉफ आणि आयशाची अशी झाली होती पहिली भेट, भेटीनंतर आयशाने आईला सांगितली होती ही गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 3:06 PM

जॅकी श्रॉफच्या पत्नीने नुकतेच याविषयी सांगितले.

ठळक मुद्देजॅकीदाची पत्नी आयेशाने यावेळी त्यांच्या आठवणी शेअर करत सांगितले की, मी जेव्हा जॅकीला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी 13 वर्षांची होते, आम्ही तेव्हा एका रेकॉर्ड शॉपवर भेटलो होतो आणि दोन मिनिटे एकमेकांशी बोललो होतो.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या वीकेंडला सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध शो इंडियन आयडलमध्ये बॉलिवूडचा गाजलेला सुपरस्टार जॅकी श्रॉफ म्हणजेच जग्गू दादाचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. जॅकी दादा 80 च्या काळामध्ये बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. त्यामुळे आगामी वीकेंडला या शोमध्ये संगीत आणि खुमासदार किस्यांबरोबरच बरेच काही पाहायला मिळणार आहे.

इंडियन आयडॉलमध्ये आशिष कुलकर्णीच्या गोरिया रे गोरिया आणि फेनी ने मुझे बुलाया या गाण्यांवरील खास परफॉर्मन्सनंतर होस्ट आदित्य नारायणने जॅकी श्रॉफला एक खास व्हिडिओ दाखवला. त्यात जॅकी श्रॉफच्या कुटुंबाने त्याच्यासाठी एक खास मॅसेज दिला होता. जॅकीदाची पत्नी आयेशाने यावेळी त्यांच्या आठवणी शेअर करत सांगितले की, मी जेव्हा जॅकीला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी 13 वर्षांची होते, आम्ही तेव्हा एका रेकॉर्ड शॉपवर भेटलो होतो आणि दोन मिनिटे एकमेकांशी बोललो होतो, त्यानंतर मी घरी गेले आणि मी माझ्या आईला सांगितले होते की, मी ज्याच्याशी लग्न करणार त्या व्यक्तीला मी आज भेटले. त्यानंतर मी त्याला तीन वर्षांनी पाहिले. पुढे आम्ही बोलायला सुरुवात केली आणि काही वेळा बाहेर फिरायला गेलो. मला वाटते की, जॅकीशी लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता आणि त्याच्यासारखा व्यक्ती मिळणं हे मी माझे भाग्य समजते. तो संपूर्ण जगातील चांगला नवरा आणि वडील आहे.

त्यानंतर आजच्या काळातील स्टार आणि जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफ म्हणाला की, तुमच्याबद्दल सर्वांनी खूप काही बोललं आहे, मलाही काही बोलायचं आहे. ‘ डॅड, आय लव्ह यू सो मच... माझ्या जीवनाचा फक्त एकच उद्देश आहे, तो म्हणजे रोज तुम्हाला अभिमान वाटेल असे काही करण्याचा आणि मला वाटते त्यात मी यशस्वी होत आहे..’ 

टॅग्स :जॅकी श्रॉफटायगर श्रॉफ