Join us

चाळीतला एक तरूण कसा बनला बॉलिवूडचा हिरो? स्टारडम मिळाल्यानंतरही जग्गू दादा राहिला एका खोलीत....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 12:53 PM

Jackie Shroff Birthday: जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. चाळीतल्या या मुलाने इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झालेत.

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आज त्यांचा वाढदिवस (Jackie Shroff Birthday) साजरा करत आहे. 1 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरात जन्मलेला जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज 65 वर्षांचे झाले आहेत. 80 च्या दशकात जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे अ‍ॅक्शन आणि रोमँटिक हिरो म्हणून ओळखले जात होते. जॅकी श्रॉफ  (Jackie Shroff ) यांनी आतापर्यंत जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केले आहे.  मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. स्वत:च्या करिअरलाच नाही तर भारतीय सिनेमालाही त्याने एक नव्या उंचीवर नेले. मुंबईच्या चाळीतला हा छोकरा जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ  (Jackie Shroff) यांची लाईफ स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. चाळीतल्या या मुलाने इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झालेत.

जग्गू दादा या नावाने लोक हाक मारायचेजॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. असे म्हटले जाते की जॅकी यांनी आपल्या चाळीतील लोकांना नेहमीच मदत केली आणि म्हणूनच त्याचे नाव जग्गू दादा ठेवण्यात आले. चाळीतले सगळे त्यांना याच नावाने हाक मारायचे. गरिबीमुळे जॅकी यांनी अकरावीनंतर शिक्षण सोडून नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती, त्यामुळे ते ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले होते पण तिथे त्यांना नोकरी मिळाली नाही.

बस स्टँडवर नशीब उघडलेअनेक दिवस नोकरीच्या शोधात भटकल्यानंतर एके दिवशी जॅकी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभे होते, तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांची उंची पाहून विचारले, 'तुला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे  का?' आणि जॅकी म्हणाला, 'तुम्ही पैसे द्याल का? जग्गू दादाचा जॅकी श्रॉफ बनण्याचा प्रवास इथून सुरू झाला. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांना सुभाष घई यांच्या 'हिरो' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आणि जॅकी रातोरात सुपरस्टार झाले.

‘हिरो’ सुपरडुपर ब्लॉकबस्टर झाल्यावर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक जॅकी यांना साईन करण्यासाठी उत्सुक होते. इतके की, अनेकजण जॅकी यांच्या घरापर्यंत पोहोचत.अनेक तास ताटकळत. जॅकी पब्लिक टॉयलेटमध्ये असेल तरीही अनेक निर्माता-दिग्दर्शक टॉयलेटबाहेर त्यांची वाट पाहत बसायचे. कारण जॅकीने आपला चित्रपट करावा, हेच प्रत्येकाचे स्वप्न होते.

‘हिरो’ सुपरडुपर हिट झाल्यानंतरही जॅकी चाळीतच राहत होते. सुपरस्टार बनल्यानंतरही अनेक वर्षे ते चाळीत राहिले. त्यांना साईन करण्यासाठी बड्या बड्या निर्माता दिग्दर्शकांनाही चाळीत यावे लागाायचे. विश्वास बसणार नाही, पण जॅकी यांनी त्याच्या अनेक चित्रपटाचे शूटींग चाळीत केले. निर्माता-दिग्दर्शक चाळीत शूट करायला तयार नसायचे. पण जॅकी यांची डिमांड त्यांना असे करायला भाग पाडायची. आजही जॅकी यांचे पाय जमिनीवर आहेत, ते याचमुळे. 

टॅग्स :जॅकी श्रॉफबॉलिवूड