Join us

जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक, ५८ लाख रुपयांना बसला गंडा; पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 2:11 PM

आएशा श्रॉफ फसवणुकीची शिकार

जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) पत्नी आएशा श्रॉफ (Ayesha Shroff) हिची फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आएशाला तब्बल 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. याप्रकरणी तिने सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. आएशा श्रॉफ जॅकी श्रॉफची पत्नी आणि टायगर श्रॉफची आई आहे. अनेकदा ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

आएशा श्रॉफ सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. तसंच मुलगा टायगर सारखीच ती देखील फिटनेस फ्रीक आहे. तिच्या फिटनेसचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतीच तिने फसवणुक झाल्याची तक्रार सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी  आरोपी अॅलन फर्नांडिसविरोधात कलम 420, 408, 465, 467 आणि 468 अंतर्गत केस रजिस्टर झाली आहे. एकूण 58 लाख रुपयांचा फ्रॉड झाल्याची तक्रार आहे. 

टॅग्स :जॅकी श्रॉफधोकेबाजीबॉलिवूडपरिवारटायगर श्रॉफ