बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती तिचा बॉयफ्रेंड एबन हायम्ससोबत धमालमस्ती करते आहे. कृष्णा श्रॉफने एबम हायम्ससोबत केलेल्या फोटोंतून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.कृष्णा श्रॉफने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एबन हायम्ससोबत बीचवर एन्जॉय करताना दिसते आहे. या फोटोतील त्यांची पोझ पाहून सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या आहेत. या फोटोतून अंदाज लावू शकतो की ते दोघे आकंठ प्रेमात बुडाला आहे.
जॅकी श्रॉफची लेक कृष्णा दिसली बॉयफ्रेंडसोबत धमालमस्ती करताना, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 18:37 IST