Join us

जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 09:26 IST

Jacky Bhagnani-Rakul Wedding : जॅकी-रकुलच्या लग्नात धीरज देशमुखांनी वेधलं लक्ष, 'त्या' कृतीमुळे नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल जॅकी भगनानी आणि रकुत प्रीत सिंह नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. बुधवारी (२१ फेब्रुवारी) गोव्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत जॅकी आणि रकुलने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जॅकी आणि रकुलच्या लग्नातील एका व्हिडिओने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

जॅकी आणि रकुलच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबीयांनीही हजेरी लावली होती. जॅकी भगनानी हा देशमुखांनी सून आणि धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख यांचा भाऊ आहे. जॅकीच्या लग्नासाठी धीरज देशमुख त्यांच्या कुटुंबासह हजर होते. मेहुण्याचं लग्न पार पडताच त्यांनी पापाराझींना मिठाई वाटली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धीरज देशमुख पत्नी आणि मुलीसह दिसत आहे. पापाराझी त्यांना फोटोसाठी आग्रह करत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पण, फोटो नंतर आधी मिठाई घ्या, असं म्हणत त्यांनी पापाराझींना मेहुण्याच्या लग्नाची मिठाई दिली. त्यांच्या या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. साऊथ गोवा येथील ITC ग्रँड हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. पंजाबी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने हे कपल लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

टॅग्स :जॅकी भगनानीरकुल प्रीत सिंगधीरज देशमुखसेलिब्रेटी वेडिंग