Join us

Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी जॅकलीन कोर्टात पोहोचली; जामीन अर्जावर आज निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:26 AM

२०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलीनच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलीनच्या जामीनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी जॅकलीन दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली आहे. जॅकलीनवर असलेल्या आरोपांवर आज सुनावणी होईल आणि जॅकलीनला दिलासा मिळाणार का याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.

जॅकलीनचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबर रोजीच संपला होता. यानंतर नियमित जामिनासाठी तिने अर्ज केला. यावर ११ नोव्हेंबर रोजी निर्णय येणार होता मात्र कोर्टाने १२ डिसेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. आता आज जॅकलीनला जामीन मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जॅकलीन कित्येक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहे. तिचे आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या वकिलांनी सांगितले होते की ते शेवटपर्यंत लढणार. आरोपी सुकेशने जेलमधून लिहिलेल्या पत्रात हे नमुद केले की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. म्हणून त्याने महागडे गिफ्ट्स दिले होते. यामध्ये जॅकलिन चा किंवा तिच्या कुटुंबाचा दोष नाही.  

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसन्यायालय