Join us

Video: गुरुपौर्णिमेला घडणार अलौकिक साक्षात्कार! 'बाळूमामा' आणि 'स्वामी समर्थ' सांगणार गुरुमहिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 09:29 IST

गुरुपौर्णिमेनिमित्त जय जय स्वामी समर्थ आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत

उद्या २१ जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. यंदाची गुरुपौर्णिमा कलर्स मराठी वाहिनीवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर होणार असून गुरुपौर्णिमेचा महासोहळा प्रेक्षकांना गुरुकृपेचा अलौकिक साक्षात्कार घडवणार आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या दोन्ही लोकप्रिय मालिकांचे एक तासाचे रविवार विशेष भाग प्रेक्षकांना गुरुकृपेची अनोखी महती सांगणारे असणार असून बाळूमामा आणि स्वामी समर्थांनी गुरुभक्तीचा सांगितलेला खरा अर्थ या विशेष भागांमध्ये उलगडणार आहे.

मालिकांचा विशेष भाग

बाळूमामांची आणि भालचंद्र महाराजांची अनोखी भेट,मामांचे गुरु सदगुरू मुळे महाराज यांची मामांच्या हस्ते पाद्यपूजा हा अलौकिक भक्तीचा भाग अनुभवता येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची आरती आणि दिव्य पाद्यपूजा यासोबतच स्वामी स्थानावरील एकनाथ (कानफाट्या) आणि नृसिंह सरस्वस्ती महाराजांचा शिष्य सायंदेव यांच्या गुरुभक्तीच्या गोष्टीतून गुरुकृपेचा अनोखा अर्थ उलगडणार आहे. यामुळे हा विशेष भाग स्वामी भक्तांसाठी खास असेल.

कधी बघाल?

 गुरुभक्तीच्या गोष्टीतून गुरुकृपेचा अनोखा अर्थ उलगडणार असल्याने स्वामी भक्तांसाठी हा भाग खूप विशेष असेल. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेचा दु 1:00 वा आणि संध्या 7:00 वा विशेष भाग पार पडणार आहे.'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा दु 2:00 वा आणि रात्री 8:00 वा. विशेष भाग पार पडेल.

टॅग्स :गुरु पौर्णिमासमर्थ मंदिरबाळूमामाच्या नावानं चांगभलंकलर्स मराठी