साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. १० ऑगस्ट रजनीकांत यांचा 'जेलर' सिनेमा रिलीज झाला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा तब्बल 600 कोटी पार नेला. जेलरने जगभरात ६00 कोटींची कमाई केली आहे. याचदरम्यान, चित्रपटला मिळालेले यश पाहून निर्मात्यांनी रजनीकांत यांना एक महागड गिफ्ट दिलं. . चित्रपटाचे निर्माते कलानिधी मारन यांनी चित्रपटाच्या यशाने खुश होऊन सुपरस्टार रजनीकांत यांना आलिशान BMW गाडी भेट दिली आहे
ती फिल्म इंडस्ट्री ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन कलानिधी मारन आणि रजनीकांत यांचे फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये निर्माते मारन त्यांना बीएमडब्लू एक्स ७ कार देताना दिसत आहे. या आधी निर्मात्यांनी जलरच्या नफ्यातील शेअरिंग म्हणून त्यांना १०० कोटींचा चेक दिला होता. मनोबाला यांनी ट्विट करत लिहिले, 100 कोटींचा चेक आणि लक्झरी कार गिफ्ट केल्यनंतर निर्मात्यांनी त्यांना लोकेश कनगराज यांच्यासोबतचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्यांच्यासोबत आणखी एक सिनेमा करण्याची विनंती केली आहे. रिपोर्टनुसार कलानिधी मारन रजनीकांत या्ंच्या घरी एक नाही तर तब्बल दोन लक्झरी कार घेऊन गेले होते. यापैकी रजनीकांत यांनी बीएमडब्लू एक्स ७ची निवड केली.
चित्रपटाची कमाई किती?नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित जेलरने जबरदस्त कमाई केली आहे. जेलरने आतापर्यंत भारतात तब्बल 328.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर चित्रपटाने जगभरात 600 कोटींचा व्यवसाय केला आहे. रजनीकांत व्यतिरिक्त या चित्रपटात तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, वसंत रवी आणि विनायकन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिवा राजकुमार यांचा दमदार कॅमिओ आहे.