युवा पिढीला धार्मिकतेबरोबर विज्ञानाचे महत्त्व कळावे, समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश समोर ठेऊन जालन्यातील कलाकारांनी विश्वविधाता श्रीपाद श्रीवल्लभ चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्यासह जालन्यातील अन्य कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला आहे. सात राज्यात चित्रीकरण झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट असून, यात तीन हजार कलाकारांना संधी देण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या भूमिका कबीर मोर्या यांनी केली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार चंद्रकांत खैरे, जालन्यातील चार्टड अकाऊंटट गोविंदप्रसाद मुंदडा, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या ही या चित्रपटात भूमिका आहेत. सुरेश वाडकर, अमृता फडणवीस, आशिष मोरे, संतोष बोटे यांनी चित्रपटात गीत गायन केले आहे. अनेक अडचणींवर मात करत तयार करण्यात आलेला हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या नफ्यातून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांसह शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याचे निमार्ते कैलास पवार यांनी सांगितले.
जालनाचे कलाकार रुपेरी पडद्यावर
By admin | Published: May 27, 2017 1:50 AM