Join us

David Warner: 'टायटॅनिक' मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:33 AM

David Warner Death : प्रसिद्ध अभिनेता डेविड वॉर्नर यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडला धक्का बसलाय.

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता डेविड वॉर्नर यांचं निधन झालंय. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. वॉर्नर यांनी अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. टायटॅनिक आणि ओमेन सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ''आमच्या आठवणीत ते कायम राहातील. एक उत्तम साथीदार, दयाळू माणूस आणि वडील व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या ह्रदयात नेहमी राहतील.''

या चित्रपटांमधून मिळाली होती ओळखवॉर्नर यांचा जन्म 1941 साली मँचेस्टरमध्ये झाला. 1997 मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या टायटॅनिक चित्रपटात ते स्पायसर लव्हजॉयच्या भूमिकेत दिसले होते. 1976 च्या हॉरर क्लासिक 'द ओमेन' मधील छायाचित्रकार कीथ जेनिंग्जच्या भूमिकेसाठीही ते ओळखला जातो.

वॉर्नर त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होते. त्यांनी 'ट्रॉन' (1982), 'लिटिल माल्कम' (1974), 'टाईम बॅंडिट्स' (1981), 'द फ्रेंच लेफ्टनंट वुमन' (1981), 'द मॅन विथ' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 2018 साली आलेल्या मेरी पॉपिन्सच्या सिक्वेलमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मोठ्या पडद्याशिवाय वॉर्नर यांनी टीव्हीच्या दुनियेतही बरेच काम केले होते. 'पेनी ड्रेडफुल,' 'रिपर स्ट्रीट,' 'स्टार ट्रेक,' 'डॉक्टर हू' हे त्यांचे काही प्रमुख टीव्ही शो होते.

टॅग्स :सेलिब्रिटीहॉलिवूड