'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार एंट्री केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. बॉलीवुडच्या चांदनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या असलेल्या जान्हवीने पहिल्याच सिनेमातून साऱ्यांनाच प्रभावित केलं. त्यामुळे धडकच्या यशानंतर ती दोन बिग बजेट सिनेमांमध्ये भूमिका साकारणार आहे. बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्यातख्त सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. मुघल साम्राज्यावर आधारित या मेगा सिनेमात अनेक बडे स्टार कलाकार भूमिका साकारणार आहेत.
रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या या सिनेमात भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना ऊर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल ऊर्फ हिराबाई बी भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही ऊर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे. जान्हवी आता ऊर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे.इतकंच नाही तर तिला काही काही पुस्तकंसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत. औरंगजेब- द मॅन अँड द मिथ आणि स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे.
फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना साकारणार जान्हवी कपूर, पाहा तिचा बिनधास्त अंदाज !
कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैनिकांवर निशाना साधण्यात येत असताना गुंजन यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या भागातून विमान उडवत सैनिकांनी सुरक्षितरित्या त्या भागातून बाहेर काढले होते. अशा शूर महिलेची भूमिका जान्हवी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.
'तख्त'बाबात बोलायचे झाले तर हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. नुकतीच जान्हवी करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये दिसली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील व करियरबाबत गोष्टी शेअर केल्या होत्या.