सहसा बॉलिवूड सेलिब्रिटी झगमगत्या इंडस्ट्रीत वावरत असतात. अनेक चॅनलला मुलाखती देत असतात. पण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल बोलणं टाळतात. सहसा समाजमाध्यमांसमोर हे सेलिब्रिटी उघडपणे काही बोलत नाहीत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने मात्र गांधी- आंबेडकर वैचारीक वादाबद्दल थेट भाष्य केलंय. जान्हवीने दिलेल्या प्रतिक्रियेची क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतेय
गांधी-आंबेडकरांनी आपल्या समाजाला मदत केली: जान्हवी कपूर
'द लल्लनटॉप'शी बोलताना जान्हवीने गांधी - आंबेडकर वैचारीक वादाबद्दल भाष्य केलं. जान्हवी म्हणाली, "मला वाटतं की आंबेडकर आणि गांधी यांच्यातील वैचारीक वाद पाहणं ही फार मोठी गोष्ट आहे. गांधी - आंबेडकर नेमके कोणत्या गोष्टीसाठी उभे आहेत, याशिवाय कोणत्याही एका विशिष्ट विषयावर त्यांची मते कशी बदलत राहिली आणि त्यांचा एकमेकांवर कसा प्रभाव पडला यामधील वादविवाद पाहणं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप मदत केली आहे."
आंबेडकर स्पष्ट विचारांचे तर गांधी...: जान्हवी कपूर
जान्हवी पुढे म्हणाली, “आंबेडकर साहेब सुरुवातीपासूनच अतिशय कठोर आणि स्पष्ट विचारांचे होते. परंतु मला वाटते की महात्मा गांधींचा दृष्टिकोन विकसित होत गेला कारण ते आपल्या समाजातील जातीय-आधारित भेदभावाला अधिकाधिक उघडकीस आणत आहेत. तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून याबद्दल जाणून घेणे आणि ते स्वतःच सहन करणे यामध्ये खूप फरक आहे. माझ्या घरी कधी जातीयवादावर बोलणं होत नाही."