Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुचर्चित 'उलझ' हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. देशभक्तीने प्रेरित 'उलझ'ची कथा खुपच खास आहे. जान्हवीचा हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. 'उलझ'ला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. आता हा प्रश्न आहे की सिनेमा ओटीटीवर कधी येणार? कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याबाबत अपडेट समोर आलं आहे.
सुधांशु सरिया दिग्दर्शित 'उलझ'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. 'उलझ' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. सप्टेंबरच्या अखेरीस हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. मात्र, स्टार कास्ट किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'उलझ' या चित्रपटात जान्हवी कपूर भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळतेय. या चित्रपटाची कथा तरुण मुत्सद्दी सुहानाच्या (जान्हवी कपूर) भोवती फिरणारी आहे. 'उलझ' चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेले कट उधळवताना पाहायला मिळतेय. जान्हवी कपूरशिवाय या चित्रपटात गुलशन देवैया, आदिल हुसैन आणि रोशन मॅथ्यू सारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधांशू सारिया यांनी केले आहे.