Join us

आईच्या आवडत्या मंदिरात मावशीबरोबर पोहोचली जान्हवी कपूर, पारंपारिक लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 4:03 PM

जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)  देखील तिची आई श्रीदेवी इतकीच दिसायला सुंदर आहे.  जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते.  जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' (Dhadak) रिलीज होण्याआधीच श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. जान्हवी कपूर ही श्रीदेवी यांच्या खूपच जवळ होती. आई गेल्यानंतर जान्हवी श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. अभिनयासोबतच ती तिच्या आईप्रमाणे धार्मिक परंपरांशीही जोडलेली आहे. 

जान्हवी कपूर अनेकदा तिची आई जिथे जायची, त्या मंदिरांना भेट देताना दिसते. आईच्या आठवणीत अशाच एका ठिकाणाला तिनं भेट दिली आहे.  जान्हवी चेन्नईतील मुप्पथम्मन मंदिरात पोहचली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचे काही फोटोही शेअर केले आहेत. जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिलं, "पहिल्यांदा मुप्पथमन मंदिरात आले आहे. चेन्नईमधील हे आईचं आवडते ठिकाण आहे'.

जान्हवी कपूर या मंदिरात पारंपारिक पेहरात गेली होती. हलका मेकअप  आणि पारंपारिक पेहरावाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फ्लोरल डिझाइन असलेला घागरा आणि त्यावर राखाडी रंगाची ओढणी तिनं कॅरी केली होती. जान्हवीच्या या पोस्टवर अभिनेता वरुण धवनने कमेंट केली आहे. मावशी खरोखर तुझी मोठी बहिण वाटतेय, असं त्यानं म्हटलं.  जान्हवी कायम चेन्नईला जात असते. श्रीदेवीचं आणि चेन्नईचं खास कनेक्शन होतं. चेन्नईत श्रीदेवी यांचां आवडता बंगला आहे. या बंगल्यामध्येच जान्हवी आणि खुशीचं बालपण गेलं आहे. त्यामुळे जान्हवीचदेखील चेन्नईशी घट्ट नातं आहे.  

सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. राजकुमार राव स्टारर चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे, जो 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रीलिज होईल. याशिवाय जान्हवीने राम चरणसोबत एक चित्रपटही साइन केलाय. जान्हवीने सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमी संवाद साधते. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडश्रीदेवीचेन्नई