ऑनलाइन लोकमतजयपूर, दि. 5 - जन्नत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनल चौहानशी एका फॅशन शो दरम्यान गैरवर्तन झाल्याचे समोर आहे. याचा खुलासा स्वत सोनल चौहानने केला. याबरबरोच शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीही शिकार झाली आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, जयपूर येथे एका फॅशन शो दरम्यान सोनलला मनस्ताप सहन करावा लागला. आयोजकांनी तिच्याशी गैरवर्तणूक करीत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आयोजकाचे नाव न घेता सोनलने हा आरोप केला आहे. सोनलच्या या आरोपामुळे शोचे आयोजक अडचणीत सापडले असून, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. शोमध्ये सोनलला शो स्टॉपर म्हणून आमंत्रित केले होते. या प्रसंगाचा सामना केवळ सोनललाच करावा लागला असे नाही तर, आयोजकांनी अभिनेत्री शमिता शेट्टीलादेखील अपशब्दाने हिणवल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर शमितासोबत त्यांनी हुज्जतही घातल्याने हा शो सध्या वादाच्या भोव-यात सापडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजक शमिता शेट्टी आणि तिच्या टीमसोबत खाण्याच्या बिलावरून हुज्जत घातली आहे. दरम्यान सोनल चौहान आणि शमिता शेट्टी यांनी, अशाप्रकारच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यापूर्वीच सर्व व्यवस्थांची माहिती घेऊनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आयोजकांची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतरच त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची की नाही, याविषयीचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. या दोघींबरोबर झालेल्या या गैरप्रकारचे पडसाद अद्यापपर्यंत पोलिसांपर्यंत पोहचले नसले तरी, त्यांनी केलेल्या आरोपांमुळे आयोजकांची बदनामी होत आहे, हे निश्चित.
जन्नत फेम सोनल चौहानशी गैरवर्तन तर शमिता शेट्टीशी हुज्जत
By admin | Published: March 05, 2017 3:53 PM