Join us

जान्हवी व सारा Be alert...!, तुम्हाला कॉम्पिटिशन सज्ज झाल्या आहेत या ५ अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:15 IST

श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

आलिया फर्नीचरवालाबॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर मोठ्या संख्येच्या फॅन फॉलोविंगसोबत आलियाचा सेलिब्रेटी क्लबमध्ये समावेश आहे.

आलिया नितीन कक्कडचा चित्रपट 'जवानी जानेमन'मध्ये सईद अली खान यांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

भावनांचा चढ-उतार आणि भावनिक कथेसोबत हा सिनेमा वडील आणि मुलीचे नातं याला अधोरेखित करणारा आहे. 

इसाबेल कैफ आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीसोबत इसाबेल कैफ टाइम टू डान्स या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

स्टेनली डि'कोस्टाद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट डान्सवर आधारीत आहे.

सुरज व इसाबेलने लंडनमध्ये शूटिंगला सुरूवात केली आहे. 

साहेर बंबा साहेर बंबा आगामी चित्रपट 'पल पल दिल के पास' यात सनी देओलचा मुलगा करण देओलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

द टाइम्स फ्रेश फेस अवार्ड जिंकल्यानंतर साहेर या रोमँटिक ड्रामा सिनेमात दिसणार आहे. 

संजना सांघी काही हिंदी सिनेमात काही सहाय्यक भूमिका केल्यानंतर संजना अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अपोजिट हिरोईनच्या भूमिकेत आपल्या करियरची सुरूवात करेल.

किजी आणि मैनी नावाने बनत असलेला हा चित्रपट चर्चित फिक्शन बुक द फॉल्ट इन आवर स्टार्सचा बॉलिवूड रिमेक आहे. 

शिवालिका ओबेरॉय मोगँबो उर्फ अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी याच्यासोबत डेब्यू करत असलेली शिवालिका पेन स्टुडिओ आणि अमरीश पुरी फिल्म्सद्वारा निर्मित आगामी सिनेमा पागल मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे.

२६ जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक रोमँटक थरारपट आहे.

शिवालिकाने साजिद नाडियाडवालाचा किक आणि हाऊसफुल ३ साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

टॅग्स :सारा अली खानजान्हवी कपूरसुरज पांचोली