'बाहुबली' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे प्रभासला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. प्रभासचे चाहते फक्त देशभरातच नाही तर जगभरात आहे. 'बाहुबली' चित्रपटाने जपानमध्येही बक्कळ कमाई करत चांगली प्रसिद्धी मिळविली होती. या चित्रपटाला जपानमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तो जपानच्या चाहत्यांना भेटण्यासाठी जाणार आहे.
प्रभासचा नुकताच २३ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आपल्या चाहत्यांना एक विशेष भेट देण्यासाठी त्याने आपल्या आगामी 'साहो' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर जपानमधील त्याच्या चाहत्यांनी प्रभास आणि साहोच्या टीमला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर प्रभासने त्याला दुजोरा दिला होता.जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच जपानचे पर्यटक भारतात आल्यानंतर हैद्राबादमधील त्याच्या घरी भेट देत असतात. त्यावेळी प्रभास आणि साहो टीम जपानच्या चाहत्यांशी विशेष भेट घेणार आहे.दरम्यान, 'साहो'चा पहिला व्हिडिओ रिलीज झाल्यावर या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दीड मिनिटांच्या या व्हिडिओत अबू धाबी येथे झालेल्या तीस दिवसांच्या चित्रीकरणाची झलक दाखविण्यात आली आहे. ज्यात ४०० लोकांच्या एका टीमने लाइव्ह अॅक्शन देत शूटिंग पूर्ण केले होते.अबू धाबीमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रभासने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, चित्रपटातील नव्वद टक्के दृश्य ही खरी आहेत. कारण चित्रपटात वास्तविकता दाखविण्यासाठी वास्तविक प्रभाव आवश्यक असतो. साधारण चित्रपटात ७० टक्के सीजीआय आणि ३० टक्के वास्तविक असते. मात्र, आम्ही अबूधाबीमधील शूटिंगमध्ये वास्तविकता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जे चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय दृश्य असेल.