‘बिग बॉस’च्या 12 व्या सीझनमध्ये एका जोडीने सर्वांना आश्चयार्चा धक्का दिला होता. ही जोडी होती भजन सम्राट अनुप जलोटा व जसलीन मथारू यांची. एकमेकांचे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड म्हणून अनुप जलोटा व जसलीन मथारू यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. अर्थात घरातून बाहेर पडल्यानंतर हा सगळा ड्रामा होता हे सिद्ध झाले होते. आता जसलीन मथारू पुन्हा चर्चेत आली आहे. पण आता गोष्ट अफेअरच्या पुढची लग्नाची आहे. होय, जसलीन मथारूने गुपचूप लग्न केल्याचे मानले जात आहे.
होय, जसलीनचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यात तिच्या भांगात कुंकू आणि हातात लाल चुडा दिसतोय. एका व्हिडीओत ती बेडरूममण्यसे दिसतेय आणि ‘चुपके से लगजा गले, रात की चादर तले....’ या गाण्यावर डान्स करतेय. या व्हिडीओत जसलीन नववधूच्या अवतारात आहे.
अर्थात टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जसलीनने लग्नाच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत. ‘चुपके से लगजा गले, रात की चादर तले...’ हे गाणे ऐकताना जसलीनला म्हणे, लग्नाची फिलींग आली आणि मग काय तिने नववधूसारखे सजून या गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्टही केला. यानंतरच जसलीनने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले.
भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारु या जोडीने ‘बिग बॉस 12’मध्ये धम्माल केली होती. बिग बॉसच्या घरातील या दोघांचे नाते चर्चेचा विषय बनले होते. याचे कारण म्हणजे, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी या दोघांनी केलेला एक खुलासा. होय, गत तीन वर्षांपासून आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, हे सांगून अनूप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर अनेकांनी अनूप व जसलीन या दोघांची खिल्ली उडवली होती तर अनेकांनी नॅशनल टीव्हीवर स्वत:चे नाते कबुल करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होती. अर्थात पुढे काही दिवसांतचं अनुप व जसलीन यांचे नाते केवळ बिग बॉससाठी केलेले एक नाटक होते, हे स्पष्ट झाले होते. खुद्द अनुप यांनीच घराबाहेर पडल्यावर जसलीन केवळ माझी शिष्या आहे. आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक केले, असा खुलासा केला होता.