उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:20 AM2023-09-22T09:20:11+5:302023-09-22T09:21:07+5:30

काय होता ७ कोटीचा प्रश्न? बघा तुम्हाला उत्तर येतंय का...

jasneel kumar from uttar pradesh became second crorepati in kbc 15 lost to 7 crores | उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

googlenewsNext

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपपरहिट शो 'कौन बनेगा करोडपती 15' (KBC 15) मध्ये एका स्पर्धकाने १ कोटी जिंकले. जसनील कुमार (Jasneel Kumar) या सिझनमधील १ कोटी जिंकणारा दुसरा स्पर्धक ठरला आहे. विशेष म्हणजे जसलीनला 7 करोडच्या प्रश्नाचं उत्तर येत होतं मात्र खात्री नसल्याने त्याने खेळ क्वीट केला. अशा प्रकारे त्याने १ करोड जिंकत जल्लोष केला. मात्र ७ करोडचा प्रश्न नेमका होता तरी काय बघा.

उत्तर प्रदेशचा जसनील रिटेल स्टोर मॅनेजर आहे. १ कोटीची धनराशी जिंकताच त्याच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. केबीसीमध्ये आपला प्रवास सांगताना तो भावूक झाला. त्यांना रडताना पाहून अमिताभ बच्चन यांनी त्याचं सांत्वन केलं. जसनीलने बिग बींच्या पाया पडत आशिर्वाद घेतले. जसनील १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला. हॉटसीटवर येण्यासाठी त्यांना ११ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. हे काही फार सोपं नव्हतं. शोपर्यंत येण्यासाठी आणि अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी ११ वर्ष वाट पाहावी लागली. १ कोटी जिंकल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तो क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

१ कोटी आणि महागडी गाडी

जसनीलला विजेता म्हणून १ कोटी आणि महागड्या ब्रँडची गाडी मिळाली. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,'मी माझ्या पूर्ण प्रवासात खूपच टेंशनमध्ये होतो. हॉटसीटवर बसण्याचं स्वप्न बघत होतो. माझ्या मुलाला पूर्ण विश्वास होता की मी हॉटसीटवर येणारच. माझ्या कुटुंबाला चांगलं जीवन देण्याची माझी इच्छा आहे. अमिताभ बच्चन यांचा पाठिंबा इतका होता की मला असं वाटलं मी कोणा जुन्या मित्रासोबत बोलत आहे. या धनराशीतून मी माझी स्वप्न पूर्ण करेन. धन्यवाद केबीसी 15.'

७ कोटीचा प्रश्न

जसनीलसमोर ७ कोटीचा प्रश्न आला तेव्हा त्याच्या मनातील उत्तर हे बरोबर होतं मात्र त्याला खात्री नव्हती. तो प्रश्न होता की,'मूळची भारतीय महिला असलेल्या लीना गाडे यांनी खालीलपैकी कोणती रेस जिंकणारी पहिली महिला रेस इंजिनीअर आहे?

ऑप्शन- ए इंडियानापोलिस 500, बी 24 घंटे ले मैंस, सी 12 घंटे सेब्रिंग, डी मोनाको ग्रांड प्रिक्स 

याचं उत्तर आहे बी २४ घंटे ले मैंस

Web Title: jasneel kumar from uttar pradesh became second crorepati in kbc 15 lost to 7 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.