Join us

Animal वर टीका करणाऱ्या जावेद अख्तरांना सिनेमाच्या टीमने दिलं सडेतोड उत्तर, ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:43 AM

तुमच्यासारखी क्षमता असलेला लेखक प्रेमभंग,...

रणबीर कपूरचा Animal २०२३ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. मात्र या सिनेमावर अनेकांनी जोरदार टीकाही केली. तरी सिनेमाचं भरघोस कलेक्शन बघता प्रेक्षकांनी Animal ला उत्तम प्रतिसाद दिला. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी Animal संबंधी एक वक्तव्य केलं. असे चित्रपट हिट होणं धोकादायक असं ते म्हणाले. आता यावर Animal टीमने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Animal टीमने ट्वीट करत लिहिले, "तुमच्यासारखी क्षमता असलेला लेखक प्रेमभंग, विश्वासघात (झोया आणि रणविजयमधील) याबदद्ल समजून घेऊ शकत नाही तर तुमची सगळी कला ही खोटी आहे. आणि जर एखाद्या महिलेचा प्रेमात विश्वासघात झाला आणि ती म्हणाली,'lick my shoe' तर तुम्हीच लोक त्याचा फेमिनिझम असा अर्थ लावाल. जेंडर राजकारणापासून प्रेमाला दूरच ठेवा. त्यांना फक्त प्रेमी म्हणा. एका प्रेमीने विश्वासघात केला, तो खोटं बोलला. तो lick my shoe म्हणाला. period."

औरंगाबाद येथे पार पडलेल्या अजंता एलोरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी Animal वर टीका केली होती. तर कालच Animal च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी दिग्दर्शक, ते रणबीर कपूरने, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांनी हजेरी लावली. रणबीर कपूर आपल्या कुटुंबासह दिसला. पार्टीनंतर Animal टीमने जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर ट्वीट करत उत्तर दिलं.

Animal haters ने मात्र Animal टीमच्या या ट्वीटवर टीका केली आहे. 'जर प्रत्येक टीकेचं उत्तर द्यावं लागत आहे तर तुम्हाला माहितीये की तुम्ही एक प्रॉब्लेमॅटिक सिनेमा बनवला आहे', 'तुम्ही स्वत:ला अल्फा मेल म्हणवता आणि दर दिवसाला होत असलेल्या टीकेचा तुम्हाला त्रास होतो, गंमतच आहे' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत.

टॅग्स :जावेद अख्तररणबीर कपूरसोशल मीडियाट्रोल