बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा जवान (jawan) हा सिनेमा सध्या सगळीकडे तुफान गाजत आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडा गल्ला जमवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर किंग खानच्या सिनेमा धुमाकूळ घातला आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. लवकरच हा सिनेमा ८०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे.
शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातील आलेल्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जवानही बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. वर्ल्डवाईल्ड या सिनेमाने 797.50 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. याची माहिती चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस रेड चिलीज एंटरटेनमेंटने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामद्वारे दिली आहे.
बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, जवानने 11व्या दिवशी 34.5 कोटींची कमाई केली. रिलीजच्या 12व्या दिवशी 14 कोटींची कमाई करू शकतो आणि ८०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शाहरुखने कबूल केले की, काही वर्षे काम न केल्यामुळे तो खूप घाबरला होता. सेटवर परत येणे त्याच्यासाठी खूप नवीन होते. तो म्हणाला की मला वेगळे वाटत होते. तथापि, अभिनेता असेही म्हणाला की तो प्रत्येक गोष्ट आनंदाने आणि सकारात्मकतेने घेतो.
अबरामने वडिलांचे स्टारडम पाहिलेलं नाही...या मुलाखतीदरम्यान शाहरुखने सांगितले की आर्यनने त्याला सांगितले होते की, मोठे होत असताना त्याला स्टारडम कसे वाटते हे कळले कारण तुमचे चित्रपट खूप हिट होते. त्याची मुलगी सुहानानेही कबूल केले की अबरामला माहित आहे की त्याचे वडील स्टार आहेत, परंतु अबरामने कधीही त्याच्या वडिलांचे स्टारडम पाहिलेले नाही. सुहाना म्हणाली, 'तुम्ही तुमच्या पुढच्या पाच चित्रपटांमध्ये इतकी मेहनत करा की अब्राहमला तुमच्या स्टारडमची जाणीव होईल.'