बहुप्रतीक्षित असलेला किंग खानचा ‘जवान’ अखेर गुरुवारी(७ सप्टेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तगडी स्टार कास्ट आणि उत्तम कथा असलेला ‘जवान’ प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. या चित्रपटाचे शो ठिकठिकाणी हाऊसफूल होत आहेत. शाहरुखने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरातही शाहरुखच्या जवानची क्रेझ पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस गाजवलेल्या जवानने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत कमी आहे. शाहरुख खानचा जवान अॅक्शनने भरलेला आहे. शाहरुख नयनताराची जोडीही खूप पसंत केली जात आहे.‘जवान’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे. आत दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, जवानने दुसऱ्या दिवशी ५३ कोटींचा गल्ला जमावला आहे. पहिल्याच दिवशी ७५ कोटींचा बिझनेस करत हिंदीमध्ये सर्वात जास्त ओपनिंग करणारा जवान हा पहिला सिनेमा ठरला. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 127.50 कोटी झाले आहे. वीकेंडला हे कलेक्शन वाढणार असल्याचा अंदाज आहे.
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.