दमदार कथा, उत्तम अभिनय आणि तगडी स्टारकास्ट असलेला शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला जवान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. शाहरुख या चित्रपटात पोलीस आणि सैनिक अशा दुहेरी भूमिकेत आहे. चार दिवसांत या सिनेमाने बम्पर कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चार दिनसांत या सिनेमाने ऐकूण किती कमाई केलीय ते जाणून घेऊया.
शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातील आलेल्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. नुकताच रिलीज झालेल्या जवान सिनेमाही बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिल्या दिवशी जवानने ७५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ५३,२३ कोटी, तिसऱ्या दिवशी तब्बल ७७. ८३ कोटींचे कलेक्शन जमवाले होते. आता चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने केलेल्या कमाईचा आकडा ही समोर आला आहे.
बॉक्सऑफिस ट्रॅकर सचनिकच्या रिपोर्टनुसार, जवानने रिलीजच्या चौथ्या दिवशी ८१ कोटींचा बिझनेस केला आहे. ऐकूण चार दिवसांत या सिनेमाने २८७. ०६ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 'जवान'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन आश्चर्यचकीत करणार आहे. शाहरुख खानचा जवान सनी देओलच्या 'गदर 2' चा 500 कोटी रुपयांचा रेकॉर्ड मोडले असा अंदाज आहे.
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.