Join us

आला रे आला 'जवान' आला! थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 9:04 AM

सकाळी ६ वाजताच चाहते थिएटरबाहेर जमा झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) सिनेमा आज रिलीज झालाय. चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला जवान आला आहे. २०२३ च्या सुरुवातीलाच शाहरुखने 'पठाण' मधून आपली जादू दाखवली. तर आता 'जवान'साठी चाहते खूपच आतुर होते. सकाळी ६ वाजताच चाहते थिएटरबाहेर जमा झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. आज 'जवान' पहिल्याच दिवशी कमाईचा पाऊस पाडेल की काय असं चित्र दिसत आहे.

आजचा दिवस खरं तर सुट्टीचा नाही. पण तरी थिएटर्सबाहेर जे वातावरण आहे ते अगदी सुट्टीसारखंच आहे. कारण शाहरुख खानच्या 'जवान'ने थिएटर्समध्ये धडक दिली आहे. चाहत्यांमध्ये सिनेमासाठी जी उत्सुकता दिसून येतेय ते बघता जवान कोटी रुपयांचा पाऊस पाडेल अशी शक्यता आहे. 'जवान' फर्स्ट डे फर्स्ट शओ पाहण्यासाठी मुंबईतील गेटी गॅलक्सी थिएटर बाहेर चाहते सकाळी  ६ वाजताच जमा झाले. ढोल वाजवून, डान्स करुन त्यांनीच एकच जल्लोष केला. 'जवान'चे पोस्टर्स घेऊन लोक शिट्ट्या वाजवत धमाल करताना दिसले. 

शाहरुखची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. सकाळी ६ च्या शोलाही होणारी गर्दी आणि चाहत्यांचा धिंगाणा याचं जीवंत उदाहरण आहे. आज दहीहंडीच्या निमित्ताने मुलांनी एकावर एक थर रचत जल्लोष केला. 

ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जोहर यांच्यानुसार, 'जवान' १०० कोटी वर्ल्डवाईड ओपनिंग करु शकते. तर भारतात पहिल्याच दिवशी सिनेमा ६० कोटींची कमाई करु शकतो. वीकेंड पर्यंत 'जवान' वर्ल्डवाईड ३०० कोटींचा बिझनेस करेल. 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खानमुंबई