Join us

जय-माहीमध्ये वादाची ठिणगी! 'या' चुकीमुळे माहीने केलं ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:17 IST

Jay bhanushali : जयने एक नवीन पोस्ट शेअर करत त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्याने केलेल्या एका लहानशा चुकीमुळे माहीने त्याला थेट सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे.

ठळक मुद्देजयने शेअर केलेल्या चुकीच्या फोटोमुळे माही झाली नाराज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही वीज. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ही जोडी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशामध्येच जयने एक नवीन पोस्ट शेअर करत त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्याने केलेल्या एका लहानशा चुकीमुळे माहीने त्याला थेट सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे.

अलिकडेच जयने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो माहीने त्याला ब्लॉक केल्याचं चाहत्यांना सांगत आहे. सोबतच तो माहीची मनधरणीदेखील करत आहे. विशेष म्हणजे या जोडीचा क्युट व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंटमध्ये माहीला जयला माफ कर अशी विनंतीही केली आहे.

जयने इन्स्टाग्रामवर माही आणि तारासोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने 'फॅमिली' असं कॅप्शन दिलं होतं. मात्र, हा फोटो माहीला आवडला नसून 'यात मी छान दिसत नाही', त्यामुळे तो शेअर करायला नको होतास, असं माहीचं मत आहे. विशेष म्हणजे याच फोटोमुळे माही नाराज झाली असून तिने जयला ब्लॉक केलं आहे. 

दरम्यान, जय आणि माही कलाविश्वातील लोकप्रिय कपल असून ते कायमच त्यांच्या कुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे या दोघांप्रमाणेच त्यांच्या लेकीचा, ताराचादेखील मोठा फॅनफॉलोअर्स आहे. 

टॅग्स :जय भानुशालीटिव्ही कलाकार