बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य आजही उलगडलेले नाही. तब्बल १० वर्षांनंतर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप केले होते. मुलीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.
सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप जियाची आई राबिया खान यांनी केला. 3 जून 2013 रोजी, अवघ्या 25 वर्षीय चित्रपट अभिनेत्री जिया खानने मुंबईतील तिच्या जुहू अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. राबिया यांनी सूरजविरोधात मुंबई न्यायालात खटला दाखल केला होता. यानंर सूरजला अटकही करण्यात आली होती. महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर सूरजला जामीन मंजूर झाला. त्यानंतर तब्बल १० वर्ष या प्रकरणाचा तपास सुरु होता. एका दशकानंतर आज कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आज २८ एप्रिल रोजी स्पेशल सीबीआय कोर्ट याप्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे. जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही सादर केले होते. अभिनेत्री आत्महत्येपूर्वी गर्भवती होती असा दावा करण्यात आला होता. बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी औषध देऊन टॉयलेटमध्ये गर्भ फ्लश केल्याचा दावाही करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, जिया चार महिन्यांची गरोदर होती. सुरजला ही गोष्ट तिने सांगितल्यानंतर ते दोघे डॉक्टरकडे गेले होते. जियाला डॉक्टरांनी अबॉर्शनसाठी काही औषधं लिहून दिली होती. ‘एबीपी लाइव्ह’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.
काय लिहिले होते जियाने सुसाईड नोटमध्ये?आत्महत्या करण्यापूर्वी जिया खानने सुसाईट नोट देखील लिहिली होती. जी तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागली. यात अभिनेत्रीने तिला होणार त्रासाबाब लिहिले होते. आता गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच उरलेले नाही त्यामुळे सर्व काही सांगण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मी याआधीच सर्वकाही गमावले आहे. जर हे तू वाचत असशील तर मी गेले आहे किंवा जाण्याच्या तयारीत आहे. मी आतून पूर्णपणे तुटले आहे. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, स्वतःला विसरले, पण तू मला उद्ध्वस्त केलंस. आता मला माझ्या आयुष्यात प्रकाशचं एक किरणही दिसत नाही कुठे. सकाळी डोळे उघडतात मात्र बेडवरुन उठावेसे वाटत नाही. कधी असे सुद्धा दिवस होते जेव्हा मी माझं भविष्य तुझ्याबरोबर पाहत होतो, आपण एकत्र राहू अशी आशा मला होती. पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस,”असं जियाने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.