Join us

'जिजाजी छत पर है'चे कलाकार निघाले कुंभमेळ्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:30 PM

सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है' या आठवड्याला प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण साहस सादर करत आहे. संपूर्ण कुटुंब ट्रेनने कुंभमेळ्याला निघाले आहे.

ठळक मुद्देसर्वजण ट्रेनमध्‍ये चढण्‍यास सज्‍ज असताना अचानक पंचमच्‍या पोटात दुखू लागते

सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है' या आठवड्याला प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण साहस सादर करत आहे. संपूर्ण कुटुंब ट्रेनने कुंभमेळ्याला निघाले आहे. पण हा प्रवास सुखकर नाही. पंचमच्‍या (निखिल खुराणा) पोटात दुखत आहे आणि ट्रेनचे ब्रेक्‍स फेल झाले आहेत.

मुरारीने (अनुप उपाध्याय) त्‍याच्‍या कुटुंबाला आणि चांदनी चौकमधील ८ पापी व्‍यक्‍तींना कुंभमेळ्याला घेऊन जाण्‍याची योजना आखली आहे. यासह इलायचीची (हिबा नवाब) पंचमसोबत प्रवास करण्‍याची इच्‍छा पूर्ण होत आहे. हे पापी व्‍यक्‍ती मुरारीच्‍या नजरेत पंचम पापी व्‍यक्‍ती असल्‍याचे सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करतात आणि त्‍यामध्‍ये यशस्‍वी देखील होतात. सर्वजण ट्रेनमध्‍ये चढण्‍यास सज्‍ज असताना अचानक पंचमच्‍या पोटात दुखू लागते. ज्‍यामुळे त्‍यांची ट्रेन चुकते. पण ते दुस-या स्‍टेशनवर जाऊन ती ट्रेन पकडतात. ट्रेनमध्‍ये जोडप्‍यांमध्‍ये रोमांस बहरत असताना अचानक धक्‍कादायक बातमीची घोषणा होते. ट्रेनचे ब्रेक्‍स फेल होतात. सर्वांच्‍या मनात धडकीच भरते. सर्वांना वाटू लागते की तो त्‍यांचा शेवटचा दिवस आहे. पण सर्वांना वाचवण्याचा एक मार्ग आहे.

पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, ''मुरारीने त्‍याच्‍या दुकानाच्‍या प्रगतीसाठी ८ पापी व्‍यक्‍तींना कुंभमेळ्याला घेऊन जाण्‍याचे ठरवले आहे. पंचम स्‍वत:ला त्‍यांच्‍यापैकीच एक असल्‍याचे सिद्ध करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. हा ट्रेन प्रवास रोलर कास्‍टर ठरणार आहे आणि प्रेक्षकांना या एपिसोडमध्‍ये भरपूर मनोरंजन मिळणार आहे.''

इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ''आगामी एपिसोड्स भरपूर रोमांच व उत्‍साहाने भरलेले आहेत. या एपिसोडसाठी शूटिंग करताना आम्‍ही खूप मजा केली, ते देखील सेटपासून दूर. पंचम व इलायची यांना प्रवासादरम्‍यान अनेक संघर्षाचा सामना करावा लागला आणि प्रेक्षकांना यामधून भरपूर मनोरंजन मिळणार आहे.''

मुरारीची भूमिका साकारणारा अनुप उपाध्याय म्‍हणाला, ''चांदनी चौक कुंभमेळ्याला भेट देण्‍यास सज्‍ज आहे. पण या प्रवासामध्‍ये प्रत्‍येकासाठी अनेक सरप्राईजेज आहेत. एकीकडे पंचमच्‍या पोटात दुखत आहे, तर दुसरीकडे ट्रेनचे ब्रेक्‍स फेल झाले आहेत. ते कुंभमेळ्याला पोहोचतात की नाही हे पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण ठरणार आहे.''

टॅग्स :जिजाजी छत पर है