परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावला आहे. यातील आर्ची परशाच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं आहे
‘फँड्री’तून समाजव्यवस्थेवर दगड भिरकावल्यानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. जात हा त्यातील एक धगधगता निखारा आहे
नागराज मंजूळेंच्या या सिनेमातील परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भुरळ घातली असून सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे
झिंगाट गाण्यावर अख्ख्या महाराष्ट्राला ताल धरायला लावणा-या आर्ची आणि परशा उर्फ रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरने शोमध्येदेखील डान्स करत प्रेक्षकांना भुरळ घातली
बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत सैराट सिनेमानं नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत सैराटने ८० कोटींचा गल्ला जमवला आहे
"सैराट"च्या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या मराठी सिनेमाच्या यशाचे हिंदीतही जोरदार सेलिब्रेशन झालं. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे संगीत दिग्दर्शक अजय-अतुलही उपस्थित होते
कपिल शर्माच्या शोमध्ये आत्तापर्यंत बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली आहे मात्र सैराट चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एखाद्या मराठी चित्रपटाचे कलाकार कपिल शर्माच्या शोमध्ये उपस्थिती लावत आहेत
संपूर्ण देशासह परदेशातील प्रेक्षकवर्गालाही ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर ठेका धरू लावणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाच्या कलाकारांनी "द कपिल शर्मा" शो मध्ये उपस्थिती लावली