रिलायन्सजिओने गेल्या काही वर्षांपासून जिओ सिनेमा जिओ युजर्सना मोफत दिले होते. परंतू, आजपासून यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले सबस्क्रिप्शनच्या रकमेचे अंदाज जिओने खोटे ठरवून आज प्लॅन जाहीर केला आहे.
JioCinema Premium सब्सक्रिप्शन लाँच करण्यात आले आहे. १२ महिन्यांसाठी आता ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या टाटा आयपीएल सुरु आहे. यामुळे जिओ सिनेमावर कमालीचा युजर येत आहे. याचवेळी रिलायन्सने सबस्क्रीप्शन जारी केले आहेत. आयपीएलसाठी हे सबस्क्रीप्शन घ्यावे लागणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी एचबीओसह अन्य सिनेमा आणि कंटेंट पाहण्यासाठी हे सबस्क्रीप्शन घ्यावे लागणार आहे.
IPL 2023 सध्या महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. यामुळे जिओ युजर्सना नाराज न करण्यासाठी कदाचित उर्वरित सामने मोफत ठेवू शकते. परंतू, पुढील वर्षापासून ज्यांनी सबस्क्रीप्शन घेतले आहे त्यांनाच आयपीएल पाहता येण्याची शक्यता आहे.
JioCinema Premium चे सब्सक्रिप्शन घेतल्यास एकाचवेळी ४ युजर्स वेगवेगळ्या डिव्हाईसवर कंटेंट पाहू शकणार आहेत. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अॅप किंवा वेबसाईटवर जावे लागणार आहे. सध्यातरी कंपनीने वार्षिक प्लॅन जाहीर केला आहे. येत्या काळात मंथली प्लॅन जाहीर होण्याची शक्यता आहे. जिओ सिनेमानवर WarnerBros सोबत हातमिळवणी झाल्याने हॅरी पॉटर सिरीज, बॅटमॅन सुपरमॅन आदींसह HBO कंटेंट पाहता येणार आहेत.