Join us

81 वर्षांचे झाले जितेंद्र कपूर, पांढऱ्या कपड्यातच का दिसतात बॉलिवूडचे 'जंपिंग जॅक'? वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 10:38 AM

जितेंद्र कपूर यांचे कपडेच नाही तर शूजही अनेकदा पांढरेच असतात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर आज 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 60 ते 90 च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे केले. 'जंपिंग जॅक' नावाने ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या कामाने आजही अनेक जण प्रभावित आहेत. नव्या पिढीसाठी ते कायमच प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया

फिट दिसण्यासाठी जितेंद्र कपूर नेहमी पांढरे कपडे परिधान करतात. आता तुम्हाला वाटेल फिटनेसचा आणि पांढऱ्या कपड्याचा काय संबंध?  जितेंद्र कपूर यांनी बराच काळ आधी अभिनय सोडला. मात्र ते सार्वजनिक ठिकाणी जेव्हा हजेरी लावतात तेव्हा नेहमीच ते पांढरे कपडे किंवा फिक्या रंगाचे कपडे परिधान करतात. इतकंच नाही तर बऱ्याचदा त्यांचे शूजही पांढऱ्या रंगाचे असतात. चित्रपटातही ते अनेकदा पांढऱ्या कपड्यात दिसले आहेत. तर याचं कारण आहे 

जितेंद्र कपूर कायम पांढऱ्या कपड्यात का दिसतात?

2021 मध्ये इंडियन आयडॉल कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, 'जेव्हा मी बॉलिवूडमध्ये आलो तेव्हा कोणीच फॅशन डिझायनर नव्हता. तेव्हा कलाकार हवं ते घालायचे. एक जण मला म्हणाला सर तुम्ही पांढऱ्या कपड्यात फिट दिसता. इतर रंगाच्या कपड्यात आपण बुटके दिसतो तर फिक्या किंवा पांढऱ्या कपड्यात आपण फिट दिसतो असं मला वाटलं. म्हणूनच त्यांना पांढरेच कपडे परिधान करणं सुरु केलं.

टॅग्स :जितेंद्रबॉलिवूडफॅशन