दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (जेएनयू)रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याचे देशभर तीव्र पडसाद उमटू लागले असताना आता बॉलिवूड सेलिब्रिटीही मैदानात उतरले आहेत. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ काल मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर निदर्शने करण्यात आली. यानंतर मुंबईच्या वांद्रेस्थित कार्टर रोडवरही आंदोलन करण्यात आले. यात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झालेले दिसले. सोशल मीडियावर या आंदोलनाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झालेत. Enough (पुरे झाले आता ) असे फलक हातात झळकवत हे सेलिब्रिटी आंदोलन करत होते.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यम, अनुभव सिन्हा, जोया अख्तर, रीमा कागतीशिवाय अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, गौहर खान, श्वेता त्रिपाठी, अली फजल, राहुल बोस असे अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याच्या निषेध नोंदवत, आंदोलनात सहभाग नोंदवला.अभिनेत्री ऋचा चड्ढा यावेळी प्लेकार्डसोबत जेएनयू हल्ल्याचा विरोध करताना दिसली.
तापसी पन्नू तिची बहीण व अन्य कलाकारांसोबत या आंदोलनात सहभागी झाली.
दिग्दर्शक जोया अख्तर व रीमा कागतीही या आंदोलनात सहभागी झालेत.
या सेलिब्रिटी आणि कलाकारांनी खार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून या आंदोलनाची रितसर परवानगी मागितली होती.