Join us

JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 12:14 PM

‘हा’ जुना व्हिडीओ का होतोय व्हायरल? जाणून घ्या कारण

ठळक मुद्देपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटक-यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  

 जेएनयूमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत  असताना दीपिका पादुकोणजेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचली आणि त्याची हेडलाईन झाली. दीपिकाच्या या कृतीचे अनेकांनी समर्थन केले असले तरी यावरून ती ट्रोलही होतेय. अनेकांनी दीपिकाच्या ‘छपाक’ या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकत तिच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. याचदरम्यान दीपिकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओ दीपिका राहुल गांधींची प्रशंसा करताना दिसतेय.

  दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. ‘ मला राजकारणाबद्दल फार काही माहित नाही. पण जे काही मी टीव्हीवर पाहते त्यावरुन  राहुल गांधी आपल्या देशासाठी जे काही करत आहेत ते आपल्या देशासाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे मला वाटते. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत.  ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असे मला वाटते.   राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, अशी माझीही इच्छा आहे. ते तरूणाईसोबत कनेक्ट असलेले नेते आहेत.  त्यांचे विचार पारंपरिक पण तेवढेच ते दूरदृष्टिचेही आहेत. जे आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत, असे दीपिका या व्हिडीओत म्हणतेय.

दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटक-यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले. पण काहींनी मात्र यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. यामुळे सोशल मीडियावर दीपिकाच्या बाजूने आणि दीपिकाच्या विरोधात असे दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ट्विटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

टॅग्स :दीपिका पादुकोणजेएनयूराहुल गांधी