जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत (जेएनयू) झालेल्या मारहाण आणि हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशात अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक जेएनयूत पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कन्हैया कुमारही दीपिकासोबत दिसल्याने हा चर्चेचा विषय ठरला. दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले. पण काहींनी मात्र यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. यामुळे सोशल मीडियावर दीपिकाच्या बाजूने आणि दीपिकाच्या विरोधात असे दोन मतप्रवाह पाहायला मिळाले. ट्विटरवर #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika असे दोन परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड करू लागले.
दीपिकाच खरी वाघीण
एकीकडे कौतुक, एकीकडे टीका
दीपिकाने तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी वापरलेला हा फंडा योग्य नाही. त्यामुळे आम्ही ‘तान्हाजी’ सिनेमा पाहणार आहोत, अशा प्रतिक्रिया विरोध करणा-यांनी दिल्या.