Join us

अभिनेता जॉन अब्राहम कोरोना पॉझिटीव्ह, पत्नीलाही लागण; म्हणाला, ‘तीन दिवसांपूर्वी...’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 10:00 AM

John Abraham corona positive : जॉनला कशी झाली कोरोनाची लागण? स्वत: दिली माहिती

बॉलिवूडमध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकापाठोपाठ एक असे अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार जॉन अब्राहम  (John Abraham) याला कोरोनाची लागण झाली आहे. जॉनची पत्नी प्रिया ही सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आहे. सोमवारी जॉनने स्वत: सोशल मीडियावरून माहिती दिली. (John Abraham corona positive) त्याच्यासह पत्नीलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं त्याने सांगितलं.  

इन्स्टाग्रामवर स्टोरीवर त्याने लिहिलं,‘मला कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचं  समजलं. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यात आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही.’ तुम्हीही काळजी घ्या आणि मास्क घाला असं  आवाहन जॉन अब्राहमने केलं आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महिम कपूर यांच्यासह अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा पती करण बुलानी, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली.दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकुरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तिनेही सोशल मीडियावरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगत स्वत:ला आयसोलेट करून घेतल्याचं म्हटलं होतं.  

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या