बॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन अब्राहम (John Abraham) आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. 17 डिसेंबर 1972 रोजी जन्मलेल्या जॉनने मॉडेलिंगपासून करिअरची सुरूवात केली. 2003 साली ‘जिस्म’ हा त्याचा पहिला सिनेमा आला. याचवर्षी साया आणि पाप हे त्याचे आणखी दोन सिनेमे रिलीज झालेत. पण जॉनला खरी ओळख दिली ती ‘धूम’ या सिनेमाने. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
जॉन खरं तर प्रायव्हेट पर्सन. आपल्या खासगी आयुष्याबद्दल त्याला फारसं बोलायला आवडतं नाही. पण पब्लिक फिगर म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. जॉनच्या अफेअरची कधीकाळी जोरदार चर्चा झाली होती. होय, जॉन एकेकाळी बिपाशा बासूसोबत (Bipasha Basu) रिलेशनशिपमध्ये होता, हे आताश: सगळ्यांनाच ठाऊक आहे.
‘जिस्म’च्या शूटींगदरम्यान जॉन व बिप्स एकमेकांच्या प्रेमात पडले होते. डिनो मोरियाशी ब्रेकअपनंतर बिपाशाच्या आयुष्यात जॉन अब्राहमची एन्ट्री झाली होती. ‘जिस्म’च्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती आणि पुढे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. एक-दोन वर्षे नाही तर बिप्स व जॉन तब्बल 9 वर्षे रिलेशनशिप होते. इतक्या वर्षातील दोघांचं बॉन्डिंग बघता, हे नातं लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असाच सर्वांचा अंदाज होता. पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं असावं. कधीकाळी ‘दो जिन्म एक जान’ असलेल्या जॉन व बिपाशाचं नातं अचानक संपुष्टात आलं. पण का? चर्चा खरी मानाल तर या ब्रेकअपसाठी एक घटना कारणीभूत ठरली होती. होय, या घटनेनंतर जॉन व बिप्स काही वर्षे सोबत राहिले. पण यादरम्यान दोघांमध्ये मतभेदाची दरी निर्माण झाली होती.
ती घटना काय होती तर 2007 मध्ये बिप्स आणि सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. एका इव्हेंटमध्ये बिप्स व रोनाल्डोने रात्री उशीरापर्यंत पार्टी केली होती आणि यादरम्यान रोनाल्डो बिप्सला किस करताना दिसला होता. अर्थात ही घटना खरी की खोटी याचा कधीच अधिकृतपणे खुलासा झाला नाही. पण असं म्हणतात की, याच घटनेनंतर बिप्स व जॉनमध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर जॉन व बिप्सचं ब्रेकअप झालं.
पुढे बिप्सने करण सिंग ग्रोव्हरला जोडीदार म्हणून निवडलं तर जॉनने प्रिया रूंचाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.