बॉलिवूडच्या हिरोईन्स स्वतहाची स्तूती करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.अभिनेत्रींच्या फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची इतरांनाही कमाल वाटते.झिरो फिगरसाठी किती मेहनत घेतात ते सर्वांना चांगलेच माहिती आहे.इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगतात.मात्र झिरो फिगरवर जॉनचा अजिबात विश्वास नाही.असे आम्ही नाहीतर खुद्द जॉननेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. नुकतेच छोट्या पडद्यावरील डान्सिंग रिअॅलिटी शो डान्स दिवानेच्या मंचावर बॉलीवूडचा मॅचो जॉन अब्राहमने हजेरी लावली होती. आगामी 'सत्यमेव जयते' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जॉनने हजेरी लावली होती.
जेव्हा अर्जुन बिजलानीने स्पर्धकांचा परिचय करून दिला तेव्हा त्याने स्पर्धकांचे कौतुक करताना त्याने फिटनेसचेही महत्त्व समजावून सांगितले. फिटनेस फ्रीक समजला जाणाऱ्या जॉन अब्राहमने स्पर्धकांना एक सल्ला दिला, तो म्हणाला, “तंदुरूस्त राहण्यासाठी उपवास करू नका अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे.झिरो फिगरची संकल्पना फसवी आहे आणि नियमित जेवणात अल्पोपहार घेणे महत्वाचे आहे. तंदुरूस्ती हे निरोगी जीवनाचे प्रमुख लक्षण आहे.”
पहिल्याच दिवशी ‘गोल्ड’ने बंपर ओपनिंगसह एकूण २५.२५ कोटी रूपये कमावले. तर ‘सत्यमेव जयते’ने पहिल्या दिवशी २०.५२ कोटी रूपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ‘गोल्ड’ने ३०.२५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तर ‘सत्यमेव जयते’ने २३.५२ कोटींचा बिझनेस केला.
‘गोल्ड’चा एकूण बजेट ८५ कोटी रूपये होता. दोन दिवसांत या चित्रपटाने ही लागत वसूल केली आहे. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’बद्दल सांगायचे तर या चित्रपटाचा एकूण बजेट ५० कोटी रूपये होता. अक्षयच्या ‘गोल्ड’च्या तुलनेत हा बजेट कमी आहे. पण जॉनचा चित्रपटही आपला हा बजेट वसूल करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. या वीकेंडला ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ला मोठा फायदा होईल, असा कयास आहे. याचा थेट परिणाम चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये दिसेल. ‘गोल्ड’मध्ये अक्षय कुमारसह मौनी रॉय, विनीत कुमार सिंग, सनी कौशल, अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर ‘सत्यमेव जयते’मध्ये जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, आयशा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तूर्तास कमाईचे आकडे बघता, ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांचा बॉक्सआॅफिसवरचा मुकाबला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.