बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम चित्रपटातील स्वत:चे अॅक्शन सीन्स स्वत: करतो. म्हणजेच, तो यासाठी बॉडी डबल वापरत नाही. धोकादायक स्टंट करताना अनेकदा जॉन जोखिम पत्करतो. याचमुळे शूटींग करताना तो अनेकदा जखमी झाला आहे. ताजी बातमीही तीच. होय, ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॉन अब्राहम जखमी झाला. यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तीन आठवडे जॉन या चित्रपटाचे शूटींग करू शकणार नाही.
जॉन अब्राहम पुन्हा जखमी, घ्यावी लागणार तीन आठवड्यांची विश्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:20 PM
होय, ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॉन अब्राहम जखमी झाला. यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
ठळक मुद्दे‘बाटला हाऊस’च्या शूटींगदरम्यानही जॉनला दुखापत झाली होती.