बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यशराज प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'पठान'मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदा या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने घेतलेल्या मानधनाबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत. असे म्हटले जात आहे की या चित्रपटासाठी जॉनने २० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
जॉन अब्राहमने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्याला असा कलाकार समजले जाते जो स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर चित्रपट हिट करू शकतो. असे म्हटले जात आहे की त्यामुळे यशराज बॅनरने या चित्रपटासाठी जॉनचे मानधन वाढविले आहे. साधारण जॉन एका सिनेमासाठी ५ ते ७ कोटी रुपये घेतो. पण या चित्रपटासाठी त्याला २० कोटी रुपये मानधन दिले जात आहे. या चित्रपटात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. त्याचे शूटिंग एकूण ६० दिवसांचे असणार आहे.