अभिनेता जॉन अब्राहम सध्या वाराणसीमध्ये सत्यमेव जयते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या अॅक्शन चित्रपटासाठी जॉनला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. आता असे समजते आहे की चित्रपटाच्या स्टंटदरम्यान जॉन जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला दुखापत झाल्यानंतर त्याला खूप दुखायला लागले. त्यानंतर लगेचच त्याला वाराणसीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील जॉन अब्राहमचे काही फोटो समोर आले आहेत. यात जॉनचे एक्सरे रिपोर्ट चेक केले जात आहे. तो मास्क लावून डॉक्टरांसोबत उभा दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार जॉनला झालेली दुखापत जास्त गंभीर नाही आहे. रुग्णालयात त्याला फर्स्ट एड देण्यात आले आहे आणि तिथून तो निघाला. त्याचे चाहतेदेखील रुग्णालयाबाहेर त्याची वाट पाहताना दिसले.