Join us

-म्हणून लाईमलाइटपासून दूर राहते John Abrahamची पत्नी प्रिया, सांभाळते कोट्यावधीचा व्याप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 5:31 PM

Who is John Abraham wife Priya Runchal: जॉन ग्लॅमर दुनियेत राहत असला तरी त्याची पत्नी प्रिया या झगमटापासून कायम दूर राहते. 2014 मध्ये जॉन व प्रिया लग्नबंधनात अडकले. पण तेव्हापासून आजपर्यंत  दोघंही फार क्वचित  एकत्र दिसले. 

जॉन अब्राहम  (John Abraham) व त्याची पत्नी प्रिया रूंचाल  (Priya Runchal) या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या हे कपल क्वारंटाइन आहे. जॉनने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली. या बातमीनंतर जॉनचे चाहते चिंतीत आहेत. पण अनेकजण प्रिया रूंचालबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. कारण जॉन ग्लॅमर दुनियेत राहत असला तरी त्याची पत्नी प्रिया या झगमटापासून कायम दूर राहते. 2014 मध्ये जॉन व प्रिया लग्नबंधनात अडकले. पण तेव्हापासून आजपर्यंत  दोघंही फार क्वचित  एकत्र दिसले. तसा जॉन स्वत:ही एक प्रायव्हेट पर्सन आहे आणि त्याची पत्नी प्रिया त्याच्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहे. लाईमलाईटपासून दूर राहणं तिला आवडतं.

प्रिया सतत कामात बिझी असते. पण पडद्यामागे. सध्या ती जॉनची फुटबॉल टीम सांभाळतेय.  शिवाय जॉनच्या मॅनेजमेंटपर्यंत फायनान्सपर्यंत सगळं काही ती बघते.जॉन आणि प्रिया 2014 मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले होते. प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे. प्रियाने अमेरिकेतच कायद्याची पदवी घेतली आणि लंडनमधून एमबीए केलं.

लग्नानंतर जवळपास 3 वर्ष जॉन व प्रिया लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान अनेकदा दोघांत बिनसल्याच्या बातम्याही आल्यात. पण जॉनने प्रत्येकवेळी या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सध्या प्रिया अमेरिका सोडून भारतात राहायला आली आहे आणि वांद्रे येथील एका फायनान्स फर्ममध्ये काम करतेय.

अशी झाली होती पहिली भेट18 जुलै 1987 रोजी जन्मलेल्या प्रियाची व जॉनची भेट एका जिममध्ये झाली होती. त्यावेळी जॉन बिपाशा बासूला डेट करत होता. पण अचानक बिपाशा व जॉनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपमागे प्रिया रूंचाल हेच कारण असल्याचं मानलं गेले होतं. अर्थात पुढे एका मुलाखतीत, बिपाशासोबतच्या ब्रेकअपमागे प्रियाचा कुठलाही रोल नसल्याचं खुद्द जॉनने स्पष्ट केलं होतं. प्रिया मला 2011 मध्ये (म्हणजे बिपाशासोबतच्या ब्रेकअपनंतर) भेटली, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड